Wednesday, June 11, 2014

गीतकार , लेखक प्रवीण दवणे यांच्याशी संवाद


गीतकार , लेखक प्रवीण दवणे यांच्याशी संवाद साधण्याची संधी आज मिळाली.

एक कवी , लेखक म्हणून त्यांची ओळख मला होतीच पण एका अतिशय छान वक्ता म्हणून त्यांचा परिचय आज झाला.

इतका मोठा , प्रसिद्ध माणूस पण मी कोणीतरी तुमच्यापेक्षा वेगळा असल्याचा आव अजिबात त्यांच्या वागण्यात नव्हता.

सुमारे ७० पुस्तके आत्तापर्यंत प्रसिद्ध झाल्याचे त्यानी सांगितले अगदी सहज सांगितले व  मी थक्क झालो.

प्रतिकूल परिस्थिती हे एक संकट आहे असे नं समजता ,नं डगमगता त्या संकटाला सामोरे जा , विजय तुमचाच आहे असे त्यानी मुलांशी बोलताना सांगितले.

एक सुरेख कविता नाट्यमय पद्धतीने सादर करून त्यानी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

आम्ही प्रथमच एकमेकाला भेटत होतो पण आपल्या आपुलकीयुक्त वागण्याने त्यांनी मला जिंकून टाकले.

Wednesday, February 2, 2011

music

नमस्कार,
मी पंडीत ह्रुदयनाथ मंगेशकर यांचा चाहता आहे व त्यांनी आजपर्यंत अनेक अजरामर गीते संगीतबद्ध केली आहेत. त्यांच्या आवाजातील बंदीशी जर कोणाकडे असतील तर त्या मला हव्या आहेत.
आपल्यापैकी कोणाकडे असतील तर मला जरूर पाठवा ही विनंती.
चिंतामणी