Wednesday, June 11, 2014

अग्रगण्य शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे दर्शन

अग्रगण्य शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे दर्शन


आज माझ्या मुलीला व तिच्या २ मैत्रिणींना बरोबर घेऊन मी इंडो जर्मन मेला बघायला गेलो होतो.


तेथे आम्हाला भारतातील एक अग्रगण्य शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे दर्शन झाले. मी मुद्दाम येथे दर्शन हा शब्द वापरला आहे . भारतातीलच नव्हे तर जगातील काही विद्वान शास्त्रज्ञांमधे त्यांची गणना होते. अशा ॠषीतुल्य , ज्ञानी ,विनम्र व ॠजु अशा विद्वान माणसाला पाहुन मला अतिशय धन्य वाटले.


मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असुन माझ्या मुलीला व तिच्या मैत्रिणींना तुम्हाला भेटायचे आहे असे मी सांगीतल्यावर कोणतेही आढेवेढे न घेता ते त्यांना भेटले व त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. इतका मोठा , विद्वान माणुस . पण त्यांची विनम्रता पाहुनच मी धन्य झालो.

shreya , Dr. Jayant Naralikar , Eshani & Reva

No comments:

Post a Comment